सीमाभागातील मराठी लोकांची व्यथा आणि समस्या या देशाला किंबहुना महाराष्ट्रातील सत्ताधार्यांना (कोणत्याही पक्ष्याचे असो) कधी कळणार नाही हेच खरे. खूप उद्विग्नतेतून आजचा हा लेख प्रपंच तुमच्या समोर मांडतोय.घटनाच अशी समोर घडली कि न आवाज न पुरावा मागे सोडत पुन्हा एकदा एक विचारांचा बळी घेतला कर्नाटक सरकारच्या व्यवस्थेने. सकृत दर्शनी अलगद वाटणारा विषय किती खोलवर परिणाम करतो याचे वास्तव तुमच्या समोर मांडणार आहे. सीमाभागातील अन्याय कोणत्या स्वरूपाचे आहेत. त्याची बांधणी किती खोलवर इथल्या व्यवस्थे मध्ये झाली आहे याचे हे जिवंत उदाहरण. बेळगाव शहराला लागून असणारे गाव. घटनेची सुरवात २०१६ मध्ये झाली. युवकाच्या घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरु आहे. हा युवक सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी युवकांसाठी गावपातळीवर अग्रेसर होता. त्यामुळे विघ्नसंतोषी लोकांना आपसूक नजरेत खटकणार. लग्नाच्या पत्रिका वाटण्याची गडबड सुरु असताना एक दिवस सकाळी घरासमोर पोलीस येवून थांबले. अवघ्या काही दिवसांवर लग्न , घरात नातेवाईक, गावातील जाणते नाव अश्यात अचानक पोलीस घरासमोर थांबल्यावर सगळेच बिथरले. कारण स...