Posts

Showing posts from February, 2020

मराठी भाषा दिन निमित्त "मराठीची निर्भया" हि कविता

Image

सीमाभागात आणखीन एक अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला

Image
सीमाभागातील मराठी लोकांची व्यथा आणि समस्या या देशाला किंबहुना महाराष्ट्रातील सत्ताधार्यांना (कोणत्याही पक्ष्याचे असो) कधी कळणार नाही हेच खरे. खूप उद्विग्नतेतून आजचा हा लेख प्रपंच तुमच्या समोर मांडतोय.घटनाच अशी समोर घडली कि न आवाज न पुरावा मागे सोडत पुन्हा एकदा एक विचारांचा बळी घेतला कर्नाटक सरकारच्या व्यवस्थेने. सकृत दर्शनी अलगद वाटणारा विषय किती खोलवर परिणाम करतो याचे वास्तव तुमच्या समोर मांडणार आहे. सीमाभागातील अन्याय कोणत्या स्वरूपाचे आहेत. त्याची बांधणी किती खोलवर इथल्या व्यवस्थे मध्ये झाली आहे याचे हे जिवंत उदाहरण. बेळगाव शहराला लागून असणारे गाव. घटनेची सुरवात २०१६ मध्ये झाली. युवकाच्या घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरु आहे. हा युवक सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी युवकांसाठी गावपातळीवर अग्रेसर होता. त्यामुळे विघ्नसंतोषी लोकांना आपसूक नजरेत खटकणार. लग्नाच्या पत्रिका वाटण्याची गडबड सुरु असताना एक दिवस सकाळी घरासमोर पोलीस येवून थांबले. अवघ्या काही दिवसांवर लग्न , घरात नातेवाईक, गावातील जाणते नाव अश्यात अचानक पोलीस घरासमोर थांबल्यावर सगळेच बिथरले. कारण स

दक्षिण मराठा साम्राज्याचे वैभव आणि इतिहास

Image
मराठा साम्राज्याचा इतिहास चाळताना बहुतेक लोक महाराष्ट्रातील राज घराणी संस्थानाचा उल्लेख करतात आणि त्यामुळेच कि काय सध्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर असणारी मराठा साम्राज्याची सीमा आणि तिथली संस्थाने दुर्लक्षित झाली आणि मराठीच्या त्या वैभवशाली पाउल खुणा काळाच्या ओघात आपले मराठी पण पुसत गेल्या आणि आज पुन्हा नव्याने त्यांच्या मराठेशाहीची आणि मराठीपणाची जाणीव करून ध्यावी लागत आहे.बेळगाव -धारवाड भाग हा प ्रामुख्याने आदिलशाहीची राजवट म्हणून त्याकडे पहिले गेले. पण भाग मराठा सरदारांकडे होता हे दुर्लक्षित केले जाते. अश्याच बेळगाव आणि धारवाड च्या मध्ये असणाऱ्या कित्तूर संस्थानाचा इतिहास हि असाच आहे. काळाच्या ओघात कित्तूर हे कानडी लोकांचे संस्थान म्हणून आता जास्त प्रचलित झाले आहे आणि म्हणूनच कि काय बेळगाव भागात देखील मराठी लोक या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात आणि कन्नड लोकांनी तो एकंदर कित्तूर इतिहास हा कन्नड भागाचा इतिहास म्हणून वर चढवला आहे. आता काही लोक आहेत जे वर वर ऐकीव गोष्टीवर कित्तूर मराठी संस्थान होते , कित्तूर राणी चन्नम्मा मराठी होती आणि तिचे शिक्षण मराठीत झाले आणि देसाई घराण्याची सून एवढ्