Posts

Showing posts from May, 2024

माय मराठी.. माझी आई..

Image
 आई.... , दोन अक्षरं काळजाला हात घालतात आणि मन कितीही सैरभैर असल तरी शांत करतात .म्हणून ती आई.. जस आपल्याला आई जन्म देते आणि ती आपली जन्मदात्री होते तशीच आपल्याला ओळख देते अशी समाजात जन्माला घालणारी मराठी आई.. हो भाषा स्वरुपी आईच खऱ्या अर्थाने जन्माला आपल्याला घालते कारण या जगात आल्यावर पहिल्यांदा आपल्या तोंडातून ती भाषाच येते आणि ती सुद्धा एकच शब्द आई.. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, मग माय मराठीला दूर केलं तर आमच्या अस्तित्वाला तरी काय अर्थ? ही तीच माय मराठी आहे जी समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेते आणि एकत्रित ठेवते. जात, धर्म , पंथ याचा भेदभाव न करता ती सगळ्यांना आपल्या पदराच्या मायेखाली प्रेमाचा निवारा देते.    पण आज त्याच पदराचा निवारा फाडून आम्ही वेगवेगळे झालो. आणि हे विसरून गेलो की आपल्या स्वार्थासाठी फडलेला त्या माय मराठीचा पदर त्या माय मराठीची अब्रू वेशीवर टांगत आहे. .. आहेत हो काही लेकर बाद असतील त्या माय मराठीच्या मायेचा गैरफायदा घेत असतील पण आज तुम्हा आम्हा बाकीच्या लेकरांची जवाबदारी नाही का ? त्या माय मराठीची अब्रू वाचवण्याची ?    मग आज तिची अब्रच नव्हे तर अस्तित्व स

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..

Image
 करताय ना महाराष्ट्र दिन साजरा ? खूप आनंदोत्सव असेल तुमच्याकडे. संस्कृतीचा जल्लोष असेलच की ? आणि हो विसरलोच हुतात्मा स्मारकावर जाऊन नमन केला की नाही ? आठवणीने करा बर का. जमलच थोडा वेळ तर त्या स्मारकाच्या बाजूला असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाखाली काही नावे कोरली आहेत ती सुद्धा वाचा.. जास्त वेळ नाही लागणार हो. या महाराष्ट्रासाठी त्या लोकांनी जीव अर्पण केला आहे आपला. निदान त्यांची नावे मुखात एकदा तरी येतील. नाही तर रोज रडणाऱ्या तुम्हा आम्हाला त्या लोकांचं बलिदान वेदना देईल अस वाटत नाही मला. कारण आपण अश्या काळात आलोय जिथे बलिदान म्हणजे एक दिवस फुले वाहण्याचा कार्यक्रम झालाय. त्या मागचा त्याग, दुःख, अन्याय याचा काही एक परिणाम आपल्यावर होत नाही. आता देखील माझा हा लेख वाचताना अनेकांच्या मनात सहज आल असेल की या गोष्टी लिहायला बऱ्या आहेत. आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्याला माहिती वगैरे वगैरे. पण लेखकाची लेखणी तेव्हाच उमटते जेव्हा त्याच्या काळजाला वेदना झालेल्या असतात. हा काय मोठा लेखक म्हणणाऱ्या लोकांना देखील माझी काय हरकत नाही हो. मराठी माणसाचा स्वभावच आहे तो , आपल्याला दुसऱ्याच कौतुक क