सीमाभागात आणखीन एक अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला

सीमाभागातील मराठी लोकांची व्यथा आणि समस्या या देशाला किंबहुना महाराष्ट्रातील सत्ताधार्यांना (कोणत्याही पक्ष्याचे असो) कधी कळणार नाही हेच खरे. खूप उद्विग्नतेतून आजचा हा लेख प्रपंच तुमच्या समोर मांडतोय.घटनाच अशी समोर घडली कि न आवाज न पुरावा मागे सोडत पुन्हा एकदा एक विचारांचा बळी घेतला कर्नाटक सरकारच्या व्यवस्थेने. सकृत दर्शनी अलगद वाटणारा विषय किती खोलवर परिणाम करतो याचे वास्तव तुमच्या समोर मांडणार आहे. सीमाभागातील अन्याय कोणत्या स्वरूपाचे आहेत. त्याची बांधणी किती खोलवर इथल्या व्यवस्थे मध्ये झाली आहे याचे हे जिवंत उदाहरण. बेळगाव शहराला लागून असणारे गाव. घटनेची सुरवात २०१६ मध्ये झाली. युवकाच्या घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरु आहे. हा युवक सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी युवकांसाठी गावपातळीवर अग्रेसर होता. त्यामुळे विघ्नसंतोषी लोकांना आपसूक नजरेत खटकणार. लग्नाच्या पत्रिका वाटण्याची गडबड सुरु असताना एक दिवस सकाळी घरासमोर पोलीस येवून थांबले. अवघ्या काही दिवसांवर लग्न , घरात नातेवाईक, गावातील जाणते नाव अश्यात अचानक पोलीस घरासमोर थांबल्यावर सगळेच बिथरले. कारण समोर आले कि, घरातील दुचाकीने एका महिलेला अपघात घडविला असून त्या महिलेने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे दुचाकी मालकाविरुद्ध. दुचाकीचा मालक हे युवकाचे वडील होते. लागलीच स्थानकात बोलविण्यात आले आणि विचारपूस सुरु झाली. पण कुणाला हेच कळेना कि अपघात कुणी केला. कारण ज्या अपघाताचे वर्णन पोलिसांनी केले अशी कोणतीच घटना घरातील कुणीच केली नव्हती. खोटी केस पडल्याची खात्री सगळ्या घरच्यांना झाली खरी पण पोलिसी खाक्या ते ऐकण्यास तयार नव्हते. पोलीस स्थानकात बोलवून चौकशीचा सपाटा सुरु केला.अरेरावी आणि उद्धट पणात लोळणार्या लोकांनी एक न ऐकत हे सत्र सुरूच ठेवले. तक्रार खोटी असल्याची खात्री करून देण्यासाठी युवकाने ज्ञात लोकांना आणि पत्रकारांना पण घेवून पोलीस स्थानकाचा वाऱ्या केल्या पण त्याचा जास्त काही उपयोग झाला नाही . पोलिसांनी अपघात केल्याची कबुली लिहून देण्यासाठी प्रचंड दबाव टाकत युवकाला हतबल केले. शेवटी खुल्या न्यायालयात कबुली दे , पैसे भर आणि केस संपले असे दडपण टाकले. लग्न समोर असल्याने युवकाने तसे नाईलाजास्तव केले. पण या घटनेची पल्ला इथेच संपत नव्हता. काही दिवसांनी २०१७ साली कोर्टाची नोटीस आली. अपघातात जखमी महिलेने नुकसान भरपाई मागितली होती. या सगळ्या तपासात पोलिसांनी युवकाच्या घरच्यांचे मोबिल लोकेशन तपासले होते जे घटनास्थळापासून खूप लांबचे होते पण तरीही पोलिसांनी दबाव टाकत परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याच्या कडून  अपघात केल्याची कबुली लिहून घेतली होती. कोर्टाची नोटीस आल्यावर युवकाने वकील मार्फत त्याला उत्तर देण्यास् सुरवात केली. पण जेव्हा नशिबाचे दरवाजे बंद असतात तेव्हा ब्रम्हदेव पण तुमची वकिली करू शकत नी. कारण इथे युवकाच्या न कळत वकील फिर्यादीच्या बाजूने झाला होता. कारण ३  वर्ष खटला ओढत होता . आज उद्या यातून सुटका होईल म्हणून आशा होती आणि अचानक अगदी अलीकडे नुकसान भरपाई करण्याची अधिसूचना कोर्टाकडून धाडण्यात आली ८०,००० रु नुकसान भरपाई देण्याची नोटीस दिली गेली. आणि व्याजासह ९६,००० रुपये देण्याचा तकादा कोर्टाच्या बेलीफ आणि फिर्यादी वकिलांकडून सुरु झाला. खटला सुरु असताना अचानक अशी नोटीस आल्यावर वकिलांना विचारणा केली तेव्हा वकिलांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. आणि मग दुसर्या माध्यमातून घटनेचा उलगडा केल्यावर कळले कि न्यायालयाची ऑर्डर २०१८ साली झाली होती आणि वकिलांनी युवकाला अंधारात ठेवले . आणि त्या दरम्यान नुकसान भरपाईची वसुली करण्यासाठी पुन्हा एक खटला पडला आहे आणि त्यामुळे घरी वकील आले आहेत याचा उलगडा झाला. पण वेळ निघून गेली होती कारण या संपूर्ण काळात हा चक्रव्यूह इतका गुंतागुंतीत केला होता कि अभिमन्यू त्यात पूर्ण अडकला होता. परिस्थिती नसताना अगदी परवा  त्याने या सगळ्यांची उकल झाल्यवर आता मार्ग समोर नसल्याने यातून सुटका करून घेण्यासाठी घरातील दागिने आणि इतर बचत गोळा करून पैसे दिले. यात चूक कोणाची काय केला पाहिजे होता यासाठी अनेकांचे सल्ले येतील पण प्राप्त परिस्थितीला तोंड देणारा तो युवक होता तेव्हा बाकीचे लोक सल्ले देतील शेवटी त्याच्या युद्धात त्याला पराभव पत्करावा लागला. सीमाभागातील आणखीन एक अभिमन्यू चक्रव्यूह मध्ये अडकला आणि त्याचे नुकसान झाले. मानसिक खच्चीकरण , आर्थिक खच्चीकरण झाले. सीमालढ्याचा खटला सरू आहे पण हे रोजचे असे अनेक अभिमन्यू चक्रव्यूह मध्ये अडकून आयुष्याची राखरांगोळी होत आहे त्यांची याची दखल कोण घेणार? राजकरणी एक दिवस येतात दोन दिवस येतात बाजू मांडायला पण सीमाभागातील लोकांना आपली लढाई शेवटी एकट्याला लढायला लागते हेच खरे. कोण किती गांभीर्याने या घटनेकडे पाहिलं किंवा यातील तृतीदाख्विण्याचा पण प्रयत्न करतील पण शेवटी या घटना सुरु आहेत आणि हा प्रश्न सुटेपर्यंत अश्या खोट्या खटल्यांमध्ये अजून किती अभिमन्यू अडकतील हे कुणीच सांगू शकत नाही. समोर घटना घडली म्हणून आज लिहितोय पण हे पाहताना टचकन डोळ्यातून पाणी  हे नक्की  .. एकच सांगेन सीमाभागातील मराठी लोकांनी आता एकमेकांची साथ घटत केली पाहिजे . सुशिक्षितांची फळी निर्माण होऊन मराठी माणसाच्या उद्धारासाठी उभे राहिले पाहिजे. कारण तुम्ही कितीही या राज्याशी सलगी करा इथे न्याय मिळणार नाही हे खरे.

Comments

  1. सीमाभागात आपणा मराठी लोकांची पराकोटीची हतबलता...अगदी दुःखद..
    आजच वाचले कि एक राष्ट्रीय पक्ष बेळगावच्या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा तयारीत, म्हणजे आता येथूनही मराठीची पिछेहाट..

    ReplyDelete
    Replies
    1. राजकारण हा एका लढ्याचा मार्ग आहे पण सध्या लढा राजकारण भोवती फिरतोय

      Delete
  2. सीमाभागतील परिस्थिती पाहता आता लवकरच न्याय मिळावे अशी आम्ही न्यायदेवतेकड प्रार्थना करेन.

    ReplyDelete
  3. वाचुन अतिशय वाईट वाटले.कनाँटकी सासुचा जाच लवकर संपावा ही देवाकडे प्राथँना.
    कोणत्याही सरकारला हा प्रश्र सोडवायचा नाही असे ऊद्ग्न मनाने म्हणावेसे वाटते.

    ReplyDelete
  4. सरकार थाटामाटात मराठी भाषा दिन साजरा करतंय पण याच मराठी भाषेचं संरक्षण करणाऱ्या सीमाभागातील मराठी तरुणांवर कानडी प्रशासन खोटे गुन्हे दाखल करून पूर्ण आयुष्याची राख रांगोळी केली जात आहे, आज सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले समानव्यक मंत्री साहेबानी बेळगाव मध्ये भेट देऊन सर्वोच न्यायालयामध्ये सीमाप्रश्न कसा लवकरात लवकर सोडवता येईल यावर लक्ष दिले पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी पत्रव्यवहार होणे गरजेचे आहे

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..

मराठीच्या पाऊलखुणा :- केरळ-कर्नाटकच्या सीमेवरील कासारगोड येथील मराठी लोक

माय मराठी.. माझी आई..