Posts

Showing posts from December, 2021

सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची बेअब्रू करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय पक्ष्यांचे कारस्थान.

Image
देशात भाषावार प्रांतरचना होण्या आधीपासून महाराष्ट्र एकीकरण समिती अस्तित्वात आहे. देशात राज्य निर्मिती करताना जे जे आयोग  नेमले गेले त्या सगळ्या आयोगाना  समितीने आपले निवेदन विस्तृत स्वरूपात दिले आहे. आमची मागणी कर्नाटकाच्या  निर्मिती आधी पासून आहे हे लक्ष्यात घ्यावं  सातत्याने मराठी  माणसाला कन्नड विरोधी दाखवून  त्यांना दोषी सिद्ध करण्याचे नीच कृत्य राजकीय पक्ष करताना दिसतात. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वामध्ये सुरु असणारा बेळगाव सह वादग्रस्त मराठी बहुल सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याचा लढा हा केंद्र सरकारच्या विरुद्ध आहे. जस कन्नड लोकांना त्यांचे राज्य प्रिय आहे तसे आम्हाला आमचा महाराष्ट्र प्रिय आहे.  नेहमी मराठी  लोकांना ऐकवले जाते कि कर्नाटकात राहता, इथलेच खाता वगेरे , अरे आम्ही आमच्याच राज्याचं खात होतो. आमच्याच राज्यात राहत होतो. हा मुंबई प्रांत होता. भाषावार प्रांत रचनेत हा भाग मराठी आहे हे सुद्धा मान्य केलाय कर्नाटक राज्याला कमी पडलं म्हणून कोणताही भक्कम आधार नसताना राजकीय स्वार्थासाठी आमचा बळी गेला. कर्नाटक राज्य कसे तयार झाले याचा कधीतरी अभ्यास करा समजेल कि बेळगावचे लो

चोर सोडून संन्याशाला त्रास - कर्नाटक शासनाचा अजब कारभार

Image
                         बंगलोर येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या कारणामुळे बेळगाव मध्ये तणाव निर्माण झाला होता. बेळगावच्या धर्मवीर संभाजी  महाराज चौकात मराठी भाषिकांनी आपला रोष व्यक्त करत शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या लोकांना त्वरित अटक करून कडक शासन करावे अशी मागणी केली. यावेळी काही समाज कंटकांनी मराठी भाषिकांना या घटनेत गोवण्यासाठी संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना केली व सदर घटना मराठी भाषिकांनी सूड घेण्यासाठी केल्याचा आरोप करत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगाव मध्ये सुरु असणाऱ्या कर्नाटकाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला खुश करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ज्या मराठी लोकांनी न्याय देण्याची मागणी केली त्यांच्यावरच गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलन करणाऱ्या मराठी लोकांनी पोलिसांवर दगडफेक करत खून करण्याचा प्रयत्न  केला असा ठपका ठेवत  ३०७ कलम सारखें  गंभीर गुन्हा दाखल  केले  आहेत. अश्या खोट्या गुन्ह्यांमुळे सीमाभागात आणखीन  संताप पसरला आहे. बेळगाव शहरात या घटनेनंतर १४४ कलम लागू केला आहे . सदर जमावबंदीचा आदेश बुधवारी दि २