Posts

Showing posts from March, 2020

मराठीच्या पाऊलखुणा :- केरळ-कर्नाटकच्या सीमेवरील कासारगोड येथील मराठी लोक

Image
                                                         (फोटो सौजन्य :- KIRTADS)                                  मराठी भाषा , मराठी संस्कृती याचा अभ्यास करेल तेवढा कमी .मुळात हि भाषा आणि संस्कृती इतकी प्रगल्भ इतकी पुरातन आणि खोलवर रुजलेली आहे कि तिचा तळ कदाचित अजून कुणी गाठला असेल. जस समुद्राच्या तळापर्यंत माणूस पोहचू शकला नाही तसचं मराठी भाषेचा तळ आम्ही अजून गाठू शकलो नाही. दूरवर पसरलेली भाषा हि या आगद मराठी साम्राज्याची साक्ष देते. मराठी हि जागतिक भाषा आहे आणि जागतिक व्यवहार करण्याचे सामर्थ्य मराठीत आहे. पण मराठी लोकांच्याच असंवेदनशिलतेमुळे आणि दुर्लक्ष केल्यामुळे आज पुन्हा पुन्हा मराठीचे सामर्थ्य जगाला ओरडून सांगायची गरज वाटत आहे. अगदी काल- परवा मुंबई हि हिंदी म्हणून प्रचार करणाऱ्या लोकांच्या कानात हे जळते तेल घालून सांगायची गरज आहे कि मुंबई पुरतेच नाही तर मराठीचे साम्राज्य हे भारतातील कोणत्याही इतर भाषेपेक्ष्या मोठे आहे. आणि त्यासाठीच या विशाल पसरलेल्या मराठी भाषेचा आणखीन एक भाग किंवा पैलू म्हणजे केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या कासारगोड येथील मराठी लोक . जे शेकडो वर्