मराठीच्या पाऊलखुणा :- केरळ-कर्नाटकच्या सीमेवरील कासारगोड येथील मराठी लोक

         
                                               (फोटो सौजन्य :- KIRTADS)               
                  मराठी भाषा , मराठी संस्कृती याचा अभ्यास करेल तेवढा कमी .मुळात हि भाषा आणि संस्कृती इतकी प्रगल्भ इतकी पुरातन आणि खोलवर रुजलेली आहे कि तिचा तळ कदाचित अजून कुणी गाठला असेल. जस समुद्राच्या तळापर्यंत माणूस पोहचू शकला नाही तसचं मराठी भाषेचा तळ आम्ही अजून गाठू शकलो नाही. दूरवर पसरलेली भाषा हि या आगद मराठी साम्राज्याची साक्ष देते. मराठी हि जागतिक भाषा आहे आणि जागतिक व्यवहार करण्याचे सामर्थ्य मराठीत आहे. पण मराठी लोकांच्याच असंवेदनशिलतेमुळे आणि दुर्लक्ष केल्यामुळे आज पुन्हा पुन्हा मराठीचे सामर्थ्य जगाला ओरडून सांगायची गरज वाटत आहे. अगदी काल- परवा मुंबई हि हिंदी म्हणून प्रचार करणाऱ्या लोकांच्या कानात हे जळते तेल घालून सांगायची गरज आहे कि मुंबई पुरतेच नाही तर मराठीचे साम्राज्य हे भारतातील कोणत्याही इतर भाषेपेक्ष्या मोठे आहे. आणि त्यासाठीच या विशाल पसरलेल्या मराठी भाषेचा आणखीन एक भाग किंवा पैलू म्हणजे केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या कासारगोड येथील मराठी लोक . जे शेकडो वर्षापासून त्या ठिकणी राहतात आणि आपल्या खासगी आयुष्यात त्यांनी माय मराठी अजूनही कायम ठेवली आहे.               

        "मराठी " हा प्रगल्भ शब्दप्रयोग आहे. या ठिकाणचे लोक त्यास " मराटी" म्हणून उल्लेख करतात. शेतकरी ,कष्टकरी आणि शिकारी करत आपले आयुष्य ते व्यतीत करतात. केरळ शासनाने यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट केले असून मागच्या म्हणजे २०११ च्या जणगणने नुसार त्या ठिकाणी २७ हजार ८२४ लोक आहेत. जे स्वतःला "मराटा" म्हणतात. या लोकांची जात म्हणजेच "मराटी" मूळ भूमीपासून दूरवर राहिलेल्या आणि संपर्क तुटल्यामुळे वर्षानुवर्षे मराठी भाषा बोली रुपात राहिली . कन्नड, तुळू , तेलगु आणि मल्याळी भाषेचे संस्कार त्यावर झाले. आणि म्हणून काळाच्या ओघात आज या "मराटी" चे स्वरूप हे आजच्या प्रगल्भ मराठी पेक्ष्या खूप वेगळे आहे. फक्त याच भागात नाही पण एकंदर दक्षिण कर्नाटक आणि केरळ च्या उत्तर भागात हा समाज विखुरला आहे . केरळमध्ये आजच्या मितीला ५० हजार आणि कर्नाटकात जवळपास ३ लाख "मराटी " लोक आहेत. यांची भाषा हि कारवार-मंगळूर पट्यात राहणाऱ्या कोकणी लोकांपेक्ष्या वेगळी असून ती मराठीच्या बोली भाषांशी साधर्म्य खाते. घरात बोलण्या इतपत त्याचे स्थान राहिले आहे कारण यांचे शिक्षण -व्यवहार सगळे आज कन्नड-तुळू -मल्याळी भाषेत चालतात. कदाचित मूळ भूमीवरील (महाराष्ट्र ) मराठी लोकांच्या दुर्लाक्ष्यामुळे ते दक्षिणेकडील भाषिक लोकांमध्ये मिसळत गेले असावे. शेती -शिकारी , मच्छिमारी करत हा समाज आपली उपजीविका करत आहे पण अधिनिक जगात आता बरेच लोक सुशिक्षित झाले असून आज मोठ्या पदांवर आहेत.           

          भाषातज्ञ ए .एम घाटगे यांनी आपल्या इंग्रजी पुस्तकात या मराठीच्या बोली भाषेचा विस्तारित स्वरुपात पसारा मांडला आहे. बोली भाषेच्या स्वरुपात असल्यामुळे तेथील लोक कन्नड-मल्याळी किंवा तेलगु लिपीचा वापर करतात. देवनागरीत जर भाषा लिहिली गेली तर नक्कीच या भाषेची  आणि समुदायाची प्रगती मूळ प्रवाहाबरोबर होईल यात शंका नाही . भाषातज्ञ ए एम घाटगे आपल्या पुस्तकात इथल्या भाषेचे स्वरूप मांडताना उदाहरण देतात ती अशी पुढील प्रमाणे, माज्झे घरी धाकले.- माझे घर लहान आहे.मले एक पुतू हा - मला एक मुलगा आहे मले तीग्गी पुतु हाती - मला तीन मुल आहेत. ते कोट्टाचे वरने काम्पले - ते कट्ट्यावरून उडी मारले ताम्बे फुलू - तांबडे फुल ता मराटी सिंता - तो मराठी शिकतो.रामैले वावरू गोंसला - रामाला काम मिळाले.        अशी शेकडो उदाहरणे , शब्दप्रयोग , घाटगे आपल्या पुस्तकात लिहितात. हा समाज भाषेनेच नाही तर संस्कृतीने सुद्धा महाराष्ट्राशी आजही साधर्म्य खातो. दक्षिणी संस्कृतीचा प्रभाव असला तरी या समाजाचा मुख्य उत्सव हा  देवीचा गोंधळ आहे .ज्याला  हे लोक "गोंधळू" म्हणतात. 

             महामायी देवीच्या नावाने जी पार्वतीचे रूप आहे, हा गोंधळ घातला जातो . यातील वाद्य आणि संगीत आता दाक्षिणात्य वाटत असले तरी हातात दिवट्या घेवून फेर धरून नाचण्याची हि पद्धत महाराष्ट्रात रुजलेल्या गोंधळ परंपरेची आहे हे नाकारता येत नाही.महाराष्ट्रात देवीचा गोंधळ हा अधिशक्ती तुळजाभवानीचा असतो जी पार्वतीचे रूप आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मूळ महाराष्ट्रातून तिथे गेल्या आहेत. दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळ मध्ये पसरलेल्या मराटी समाजात हि प्रथा आजही कायम आहे. कर्नाटकातील वास्तव्यास असणारा समाज हा बाह्य रूपाने कानडी झाला आहे पण त्यांची ओळख हि मराटी समाज म्हणूनच आहे. यासाठी महाराष्ट्रातील भाषा तज्ञ आणि भाषिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी काम करून या लोकांना मराठीच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

                                   ( फोटो सौजन्य :- जै भारती मराठी सेवा संघ फेसबुक पेज )

               कर्नाटकात आता या समाजाची अनेक संघटने आहेत , समुदाय भवने आहेत. पण व्यवहारात कन्नड किंवा तुळू असल्याने हा समाज कळून येत नाही. नावात मराठी आणि यांच्यात नाईक आडनावाचे लोक आढळतात त्यावरून त्यांचे बाह्यरूप मराठी आहे .यांची बोली ऐकली तरच त्यांची पूर्ण ओळख मराटी म्हणून करता येते.      

         मराठी भाषेच्या अनेक बोली भाषा आणि बोली भाषिक लोकांपैकी हा एक पैलू. द्राविडी संस्कृतीने अच्छादलेला मराठीचा हा ठेवा भाषे पेक्षा जात म्हणून पुढे येत आहे. याला अभिमान म्हणावा कि अधोगती हा तर्क मी करू शकत नाही आहे. भाषा हीच आपली जात होणे हा अभिमान असला तरी ती भाषा फक्त बोली रुपात उरली असून त्याचे बाह्यरूप द्राविडी झाले आहे हे दुखद वाटते.पण  शेकडो वर्षे लोटली तरी ती आजही जपली जाते याचे समाधान आहे. महाराष्ट्र सरकारने आणि भाषा चळवळीतील कार्यकर्त्यांनी यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे मराठी पण जपले पाहिजे ,ते मराठी पण पूर्ण केले अहिजे असे वाटते. नाही तर काळाच्या ओघात हा समाज फक्त "मराटी " या जात नावापुरताच राहील आणि भाषा पुसून जाईल. 

Comments

  1. I, too, regret that this dialect of "मराटी", and the particular sub-culture accompanying it, will slowly erode. But a small community of people of culture/language X, if they live in a community of culture/language Y will generally lose their identity and language over a period of time. It is unavoidable.

    You may know that Tanjavur Marathi (and the culture accompanying it) has survived, and is likely to survive in Tamil Nadu -- both because the size of the community is much larger and because, unlike Kasargod Marathi people, they are financially better off and can therefore actively participate in maintaining their culture and identity.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..

माय मराठी.. माझी आई..