दक्षिण मराठा साम्राज्याचे वैभव आणि इतिहास

मराठा साम्राज्याचा इतिहास चाळताना बहुतेक लोक महाराष्ट्रातील राज घराणी संस्थानाचा उल्लेख करतात आणि त्यामुळेच कि काय सध्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर असणारी मराठा साम्राज्याची सीमा आणि तिथली संस्थाने दुर्लक्षित झाली आणि मराठीच्या त्या वैभवशाली पाउल खुणा काळाच्या ओघात आपले मराठी पण पुसत गेल्या आणि आज पुन्हा नव्याने त्यांच्या मराठेशाहीची आणि मराठीपणाची जाणीव करून ध्यावी लागत आहे.बेळगाव -धारवाड भाग हा प्रामुख्याने आदिलशाहीची राजवट म्हणून त्याकडे पहिले गेले. पण भाग मराठा सरदारांकडे होता हे दुर्लक्षित केले जाते. अश्याच बेळगाव आणि धारवाड च्या मध्ये असणाऱ्या कित्तूर संस्थानाचा इतिहास हि असाच आहे. काळाच्या ओघात कित्तूर हे कानडी लोकांचे संस्थान म्हणून आता जास्त प्रचलित झाले आहे आणि म्हणूनच कि काय बेळगाव भागात देखील मराठी लोक या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात आणि कन्नड लोकांनी तो एकंदर कित्तूर इतिहास हा कन्नड भागाचा इतिहास म्हणून वर चढवला आहे.
आता काही लोक आहेत जे वर वर ऐकीव गोष्टीवर कित्तूर मराठी संस्थान होते , कित्तूर राणी चन्नम्मा मराठी होती आणि तिचे शिक्षण मराठीत झाले आणि देसाई घराण्याची सून एवढ्या माहितीवर स्वर्ग गाठताना दिसतात. भलेही या गोष्टी खर्या असल्या तरी त्या पुरेश्या वाटत नाहीत कारण तिथे हे लोक कमी पडतात ते सिद्ध करताना. पण या गोष्टी आहेतच आणि त्या व्यतरिक्त अनेक पुरावे आता अभ्यासादरम्यान समोर येत आहेत. ब्रिटीश दस्तावेजात हा भाग दक्षिण महाराष्ट्र किंवा दक्षिण मराठा साम्राज्य किंवा दक्षिण महारट्ट साम्राज्य म्हणून नोंदविले आहे. जे अगदी पुरेसे आहे आहे कि भाग मराठा साम्राज्याचा (मराठी साम्राज्याचा ) भाग होता. यापुढे लिहिताना हे नमूद करणे महत्वाचे वाटते कि कर्नाटकच्या प्रच्यावस्तू संग्रहालय आणि परंपरा विभाग ,बंगळूर यांच्या वतीने प्रसिद्ध पुस्तकात नमूद आहे कि हिरेमल्लाशेट्टी याला १५८५ साली "हुबळी परगणा" मधील हुबळीची सर देशमुखी दान म्हणून मिळाली. त्यानंतर १२ राजांनी कित्तूर वर राज्य केले . आता आदिलशाही तील हे शब्द "परगणा" आणि " सरदेशमुखी" हे शब्द मराठीच्या पाउलखुणा नाहीत तर अजून काय ? आणि सरदेसाई घराणे पुढे आले. नंतरच्या काळात हा सगळा भाग मराठा साम्राज्याचाच भाग बनला आणि आज घडीला अनेक असे पूवे आहेत कि या संस्थानाचा कारभार हा मराठीत चालत होता.
कित्तूर संस्थान लहान असले तरी त्याच्या सीमा या सध्याच्या बेळगाव -धारवाड-कारवार जिल्ह्यातील भागापर्यंत पसरल्या होत्या. कित्तूर संस्थान हे वैभवशाली होते कित्तुरचा किल्ला पाहिल्यावर त्याची प्रचीती येते पण किल्यातील संपती आणि खजाना हा ब्रिटीशांच्या नजरेत खुपत होता हे त्यांच्याच नोंदीवरून कळते. कारण दत्तक वारसा कपटी वृत्तीने नाकारणे आणि संस्थान ताब्यात घेतल्याचे आज उघड आहे एवढेच काय बॉम्बे गाझेट मधील नोंदीत दिसते कि कित्तूर किल्ला ताब्यात घेतल्यावर किल्यातून १६ लाख रुपये , ४ लाख रुपये किमतीचे दागिने १ हजार उंट , आणि कित्येक घोडे आणि हत्ती ब्रिटिशांनी मिळवली एवढेच काय तर या व्यतरिक्त आणखीन ४ लाख रुपये मिळाल्याच्या नोंदी इथे सापडतात ..
वैभवशाली मराठी साम्राज्याचा हा आच्छादित केलेला इतिहास जगासमोर येणे गरजेचे आहे आणि तेही स्वभाषेत ..
(क्रमशः )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो..संयुक्त महाराष्ट्राचा धागा हो..

माय मराठी.. माझी आई..

Need Justice to the Farmers, who are Suffering because of Halga- Macche Bypass land aquicision at Belgaum